⚡सावंतवाडी ता.०४-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या मताधिक्यानंतर शहरातील भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. गुलाल उधळून, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करत मतदारांना धन्यवाद दिले.
सावंतवाडीतून सर्वाधिक मताधिक्य नारायण राणेंना मिळेल असा विश्वास श्री.गोंदावळे यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, निलेश राणे, मंत्री उदय सामंत, किरण सामंत, आ.शेखर निकम आदींचे त्यांनी आभार मानले. महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मेहनतीच हे फळ असल्याच अजय गोंदावळे म्हणाले. याप्रसंगी भाजप शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, अँड. संजू शिरोडकर, संजय नाईक, निशांत तोरसकर, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, ओंकार सावंत, निखील सावंत, सौरभ सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
