मुकेश बांवकर यांच्या वाढदिनी ३ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

ग्लोबल रक्तदाते व लायन्स क्लबचा पुढाकार;बांवकर आदर्श रक्तदाते असल्याने खास नियोजन

*💫मालवण दि.३०-:* ग्लोबल रक्तदाते मालवण व लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण मधील आदर्श रक्तदाते श्री. मुकेश बावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत दैवज्ञ भवन, मालवण येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त मुकेश बावकर हे आपले वैयक्तिक ५० वे रक्तदान करणार आहेत. या रक्तदान शिबिरासाठी मुथ्यूट फिनक्रॉप मालवण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कोरोना विषयक शासकीय नियमांचे पालन करून शिबिराचे आयोजन होईल. अधिक माहिती साठी श्री.राजू बिडये:- 94202 61332, निलेश गवंडी:-7620145805 यांच्याशी संपर्क साधावा. रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page