हिंदी मोनो एक्टिंगमध्ये मारली बाजी;मालवण स का पाटील महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी
*💫मालवण दि.३०-:* मुंबई विद्यापीठाच्या ५३ व्या युवा महोत्सवाच्या पात्रता फेरीत मोनो ऍक्टिंग कलाप्रकारात झोन ११ सिंधुदुर्गमधून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी देवेन कोळंबकर याने तिसरा क्रमांक प्राप्त केला. देवेन याची मोनो ऍक्टिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. मुंबई विद्यापीठाचा ५३ वा युवा महोत्सव व्हर्चुअल पद्धतीने झाला. मुंबई विद्यापीठामधून ३२ महाविद्यालये सहभागी झाली होती. जिल्ह्यातील आठ महाविद्यालये सहभागी झाली होती. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. शंकर खोबरे यांनी युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देवेन कोळंबकर याने हिंदी भाषेतून केलेल्या मोनो ऍक्टिंग सादरीकरणाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. देवेन याचे कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन केले.
