अध्यक्ष प्रथमेश तोरसकर तर उपाध्यक्ष विजय तोरसकर
*💫सावंतवाडी दि.२९-:* आरोंदा विभागाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात नूतन विभागीय अध्यक्षपदी प्रथमेश तोरसकर, उपाध्यक्षपदी विजय तोरसकर यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेतर्फे आज आरोंदा विभागात तालुकाध्यक्ष अॅड. वैभव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पाडली. यावेळी नूतन विभागीय अध्यक्षपदी प्रथमेश तोरसकर, उपाध्यक्षपदी विजय तोरसकर, सचिवपदी दिनेश तोरसकर, खजिनदारपदी निकलेश तोरसकर, ज्येष्ठ सल्लागारपदी चंद्रशेखर तोरसकर, अशोक तोरसकर तर सदस्य म्हणुन मिथुन तोरसकर, प्रवीण तोरसकर, स्वप्नील तोरसकर, गितेश तोरसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सदानंद पवार, उपाध्यक्ष सदानंद होडावडेकर व सुनील न्हावेलकर, ज्येष्ठ सल्लागार हनुमंत कारिवडेकर, सावंतवाडी शहर उपाध्यक्ष अक्षय चव्हाण तर सदस्य उत्तम न्हावेलकर व मोहन पवार, दयानंद तोरसकर, सौरभ तोरसकर उपस्थित होते. यावेळी अॅड. वैभव चव्हाण यांनी आरोंदा विभागाच्या नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या. तर माजी विभागप्रमुख चंद्रशेखर तोरसकर यांच्या चांगल्या कार्याबद्दल अभिनंदन केले.
