मळगांव बाजारपेठ दुसऱ्या दिवशी बंद…

कोरोना रुग्ण मिळाल्याने निर्णय:नागरिकांचा चांगला प्रतिसाद

*💫सावंतवाडी दि.२९-:* मळगाव येथे कोविड रुग्ण सापडल्याने सावधगिरी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. बाजारपेठ बंद असल्याने ग्राहकांअभावी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पसरला होता. कोविड-१९ ची दुसरी लाट पसरत आहे. मळगाव येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने डॉक्टर, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळता रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दर सोमवारी व्यापाऱ्यांचा बंद असल्याने आजही बाजारपेठ बंद होती. सर्वच दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.

You cannot copy content of this page