*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* डेरवण येथे झालेल्या युथ गेम मध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील पूर्वा संदीप गावडे हिने दुसरा क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने विविध क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय युथ गेमचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडे हिने 100 मीटर फ्री स्टाइल प्रकारात दुसरा क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले तिने बटरफ्लाय प्रकारातही उत्तम कामगिरी करत चवथा क्रमांक मिळवला तिला क्रीडा प्रोबोधिनी येथील जलतरण प्रशिक्षिक बालाजी केंद्रे आणि सिंधुदुर्गनगरी येथील श्री कृष्णा याचे मार्गदर्शन लाभले पूर्वा ही पुणे बालेवाडी येथील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी मध्ये राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षण घेत असून तिथेच आठवीमध्ये शिकत आहे कोरोनामुळे सध्या ती सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये सराव करीत आहे दरम्यान सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावमध्ये प्रशिक्षण घेणारे मानस बांदेलकर ,साक्षी गाड,शमिका चिपकर,रुद्र सुलोकार,हर्षवर्धन कदम यांनीही डेरवण येथील जलतरण स्पर्धेत सहभाग घेत उत्तम परफॉर्मन्स दिला
जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडेला सिल्व्हर मेडल…
