अखेर सिंधुदुर्गातील बसेस पेडणे स्थानकात…

नागरिकांच्या पाठपुराव्याला यश ः आदेश असतानाही डावलल्याचा प्रकार..

⚡बांदा ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणार्‍या महाराष्ट्र परिवहन वाहतूक विभागाच्या बसेस पेडणे बसस्थानक डावलून महामार्गाद्वारे सरळ म्हापसा-पणजीला जातात. संबंधित खात्याकडे पत्र व्यवहार करून पेडणे बसस्थानक डावलूनये असा आदेश असूनसुद्धा बस चालक व वाहक पेडणे बस स्थानकात बसेस आणत नाहीत असे लक्षात आले. त्यानंतर पेडणे वाहतूक विभागाच्या सहकार्याने नागरिकांनी महामार्गावर उभे राहून संबंधित बसेस पेडणे बस स्थानकावर येण्यास बजावले.


पेडणे येथील नागरिक जगन्नाथ पंडित यांनी गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून पेडणे बस स्थानकात बसेस येत नसल्याचे अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले. तसेच पेडणे बसस्थानकावर बसेस आणण्यासाठी मागणी केली. पत्र व्यवहारानंतर असे दिसून आले की परिवहन खात्याकडून स्थानकावर बसेस नेण्याचा आदेश असताना सुद्धा वाहक व चालकांनी बसेस नेले नाहीत. त्यानंतर नागरिकांनी पेडणे वाहतूक विभागाची भेट घेऊन माहिती दिली व लेखी निवेदन सादर केले.

You cannot copy content of this page