शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल…

प्रभाकर हडकर यांचे प्रतिपादन…

⚡मालवण ता.२४-:
जगामध्ये हिंसांचे प्रकार वाढत असून याला आळा घालण्यासाठी तथागतांचा धम्मच सावरू शकेल. तथागतांचे सम्यक विचार, सम्यक वाणी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी असे प्रतिपादन प्रभाकर हडकर यांनी येथे बोलताना केले

मसुरे बौद्ध विकास मंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रभाकर हडकर हे बोलत होते

यावेळी व्यासपीठावर ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सुगंध तांबे, मुंबई मंडळाचे सचिव संतोष तांबे, अनिल तांबे, बाबुराव तांबे, मिलिंद तांबे, राजेंद्र तांबे, दीपक तांबे, मुरलीधर तांबे,सागर तांबे, गणेश तांबे, प्रमिल तांबे, महिला मंडळाच्या अध्यक्ष वेदिका तांबे, मृणाल तांबे, अवंतिका तांबे, मेनका तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री हडकर यांनी हा समतेचा जागर जागृत ठेवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे, यासाठी धम्माचे आचरण योग्य होणे आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार आपल्याकडून होईल असेही सांगितले

यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये लागणारे साहित्य वितरीत करण्यात आले. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बीएमसी मधून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर तांबे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच सुभाष कासले, बबन तांबे यांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे यांनी तर आभार सागर तांबे यांनी मानले.

You cannot copy content of this page