⚡कणकवली ता.२२-: तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसाचामुळे साकेडी-फौजदारवाडी येथील रामचंद्र घाडी यांचे घरावर झाड पडून नुकसान झाले होते. घाडी यांना युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी स्वखर्चातून पत्रे दिले. यावेळी मुरारी राणे, नामदेव सावंत, सागर मेस्त्री, सुनील घाडी, कृष्णा तेली आदी उपस्थित होते. ही मदत केल्याबद्दल घाडी यांनी नाईक यांचे आभार मानले.
सुशांत नाईक यांच्याकडून रामचंद्र घाडी यांना मदत…
