स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 23 मे रोजी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वा. धार्मिक विधी, रुद्र स्वाहाकार, अभिषेक, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळच्या सत्रात भजने सादर होतील.

रात्री 9 वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा ट्रिकसीनयुक्त हर्षला अयोध्या नगरी हा प्रयोग सादर होईल. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page