दीर्ध आजाराने हिंदुजा रुग्णालयात आज घेतला अखेरचा श्वास;कणकवली न .प मध्ये दोन वेळा होते सीओ
कणकवली : डहाणू नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी तथा कणकवली नगरपंचायत चे माजी मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. अतुल पिंपळे यांनी कणकवली नगरपंचायतमध्ये 2 वेळा मुख्याधिकारी पदाचा यशस्वी कारभार सांभाळला होता. कणकवली हुन त्यांची डहाणू नगरपरिषदेत मुख्याधिकारीपदी बदली झाली होती.मागील काही वर्षे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपळे यांच्या निधनाने अत्यंत उमदे आणि प्रशासकीय अभ्यासू असे हुशार व्यक्तिमत्व हरपले.
