तायक्वांदो स्पर्धेत कणकवलीच्या खेळाडूंचे यश…

⚡कणकवली ता.१४-: तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मान्यतेने रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य ओपन किरोगी व पुमसे निमंत्रित तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरी येथील रॉयल बॅक्यूट हॉल येथे पार पडली. यात कणकवली तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले.


सबज्युनिअर गटामध्ये स्पृहा राणे हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. सब ज्युनिअर गटामध्ये ऋन्मय शिरवलकर याने कास्य पदक पटकावले आहे. ज्युनिअर गटामध्ये दुर्वा गावडे, ऋतुजा शिरवलकर यांनी कास्य पदक पटकावले. या स्पर्धेमध्ये आराध्या सबनीस, श्रुती गाडेकर, श्रीष्टी परीट, वेद खाडये, शिवांग पेडणेकर, प्रेसित कामत, ओमकार पाटील, लौकिक मुंडले, प्रणव कुडाळकर, अथर्व तेली यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या खेळाडूंना तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुळकर्णी, सुधीर राणे, अमित जोशी, विनायक सापळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page