⚡कणकवली ता.१४- : छत्रपती संभाजी राजे यांची जयंती येथील जुने भाजी मार्केटमध्ये माऊली मित्रमंडळातर्फे साजरी केली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, अशोक करंबेळकर, अविनाश गावडे, भगवान कासले, प्रसाद पाताडे, जमिल कुरैशी, लक्ष्मण महाडिक, बाबुराव घाडीगावकर, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, योगेश पवार, श्रीमती धुरी, मंगेश चव्हाण, ओमकार चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रभाकर कदम, पांडुरंग साळुंखे, नीलेश निखार्गे आदी उपस्थित होते. संभाजी राजे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजेंद्र पेडणेकर व अशोक करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
