पाडलोसमध्ये रस्त्याची साईडपट्टी गायब…

अपघात झाल्यास अधिकारी जबाबदार : भाजपचे काका परब यांचा इशारा..

⚡बांदा ता.१४-: पाडलोस-मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे खडीकरण केलेल्या रस्त्याची साईडपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कोसळली. पाईपलाईनसाठी केलेल्या खोदाईकडे अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. दोन वाहनांना बाजू देताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. संरक्षक भिंतीची गरज असून याकडे दुर्लक्ष करत खडीकरणाचे काम सुरू आहे. भविष्यात येथे अपघात झाल्यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे भाजप युवामोर्चा सावंतवाडी तालुका सरचिटणीस तथा पाडलोस ग्रा.पं. सदस्य काका परब यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात साईडपट्टी कोसळली अन रस्ता धोकादायक बनला. एक वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष जात नाही. या ठिकाणी संरक्षक भिंतीची गरज असून याकडे दुर्लक्ष का होत आहे? केवळ कार्यालयात बसून रस्ते निर्धोक बनत नाही तर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अशा भोंगळ कार्यपद्धतीकडे लक्ष वेधणार असल्याचे भाजपचे काका परब यांनी सांगितले.
कामचुकारपणा की, निधी नाही?
पाडलोस-केणीवाडा येथील रस्ता वर्षभर धोकादायक स्थितीत आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कामचुकारपणा केला की साईडपट्टी सुरक्षित करण्यासाठी निधी नाही असा सवाल काका परब यांनी केला आहे. तसेच खडीकरणाबरोबर अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंत बांधणेही तितकेच महत्त्वाचे असून याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.

You cannot copy content of this page