परशुराम उपरकर:पैसे वाटल्याचा विडीयो माझ्या हाती.; या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार..
⚡सावंतवाडी ता.१४-: राणेंना विकास काम केले नाहीत किंवा रोजगार दिला नाही म्हणून त्यांना निवडनुकीत पैसे वाटण्याची वेळ आली,असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे केली.दरम्यान जिल्ह्यात पैसै वाटण्याची परंपरा ही 2005 पासून राणेंनी सुरू केली आहे.तसेच पैसे वाटल्याचा विडीयो देखील आपल्याकडे आला असून या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याच देखील श्री.उपरकर यांनी आज येथे सांगितले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
