*साई कल्याणकरांची माहिती ; निधी प्राप्त झाल्याचे विशेष पोलिस महासंचालकांचे पत्र._
*💫बांदा,दि२७-:* येथील पोलिस कर्मचारी वसाहत नव्याने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी गृहखात्याच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे, असे पत्र विशेष पोलिस महानिरिक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिले आहे. याबाबत बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी गृहखात्याचे लक्ष वेधले होते. तसेच बांदा येथे असलेल्या पोलिस कर्मचारी वसाहत नव्याने उभारण्याबाबत योग्य ती सकारात्मक भूमिका घ्या, अशी मागणी केली होती. त्यानुसार आज श्री.कल्याणकर यांना सिंह यांचे पत्र प्राप्त झाले आहे. याबाबतची माहीती कल्याणकर यांनी दिली. ते म्हणाले, गेली अनेक वर्षे हा प्रश्न अंधातरीत होता. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणार्या कर्मचार्यांना भाड्याच्या खोल्या घेवून अन्यत्र रहावे लागत होते. या वसाहतीसाठी आवश्यक असलेला निधी प्राप्त झाल्यामुळे हा प्रश्न सुटल्यात जमा आहे. परंतू त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा पालकमंत्री उदय सामंत व स्थानिक आमदार दिपक केसरकर यांनी करणे गरजेचे आहे, असे कल्याणकर म्हणाले.
