हरकुळ बु. येथे उद्यापासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०८-: हरकुळ बुद्रुक येथील श्री देव इस्वटी महापुरुष देवालयात 9 ते 11 या कालावधीत श्री देव इस्वटी महापुरुष सप्तप्रहरी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार आहेत.


गुरुवार 9 रोजी सकाळी 9 वा. उदक शांती, होम हवन, सायंकाळी 5 वा. ज्येष्ठ व दानशूरांचा सत्कार सोहळा, रात्री 8 वा. रामकृष्ण हरी महिला भजन मंडळ, सेवासंघ तेंडोलीचे बुवा जुई राऊत यांचे भजन, 9 वा. सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ, हळवल यांचे भजन होईल.
शुक्रवार 10 रोजी सकाळी 8.30 वा. घटस्थापना व अभिषेक, 9.30 वा. अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ, 11.30 वा. दत्तकृपा प्रा. भजन मंडळ, वैभववाडीचे बुवा विराज तांबे यांचे भजन, सायंकाळी 5 वा. स्थानिकांची दिंडी मिरवणूक, 6 वा. भजनांचा कार्यक्रम, रात्री 9 वा. विश्‍वकर्मा महिला दिंडी भजन मंडळाचे बुवा नंदू मेस्त्री यांचे भजन, 10 वा. श्री लिंगेश्‍वर पावणादेवी वारकरी दिंडी भजन, कासरल-बांदेवाडी यांचे आकर्षक वारकरी देखावे.
शनिवार 11 मे रोजी 9 वा. भजने, 9.30 वा. घटविसर्जन, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद होईल. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन काळेथरवाडी मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page