⚡कणकवली ता.०८-: परशुराम जयंतीनिमित्त वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात शुक्रवार 10 मे रोजी महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या कणकवली शाखेतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 4.30 वा. प्रभू परशुराम प्रतिमा पूजन व मंत्र पुष्पांजली, 5 वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी 5. 30 वा. हर्ष नकाशे यांची स्वरहर्ष संगीत मैफल होणार असून त्यांना संगीतसाथ पंकज सावंत, सुबोध मांडलकर, चिन्मय सावंत, सचिन खोचरे करणार आहेत. सूत्रनिवेदन संजय कात्रे हे करतील. 7 वा. आरती व प्रसाद होईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
