कर्जबाजारीपणाला कंटाळून वाफोली येथील एकाची आत्महत्या…

⚡बांदा ता.०८-: कर्जबाजारीपणाला कंटाळून वाफोली कुडेरानवाडी येथील मोहम्मद इकबाल मदार शेख (वय ४६) यांनी भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. त्यांच्या मागे पत्नी आहे. ते मूळचे पुणे येथील असून त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी आपल्या सहकारी यांच्यासह घटनास्थळी जात पंचनामा केला. मयत शेख हे बांदा परिसरात फरशी बसविण्याचे काम करत होते.

You cannot copy content of this page