⚡कणकवली ता.०८-: तळेरे येथील मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा गुरुवार 9 मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
सकाळी 8.30 वा. धार्मिक विधी, दुपारी 1 वा. महाप्रसाद, दुपारी 3.30 वा. देवदर्शन व तीर्थप्रसाद, सायंकाळी 6 वा. ओमकार म्हाडदळकर यांचे भजन, 7.30 वा. श्री गांगेश्वर प्रा. भजन मंडळ, तळेरे-गावठण यांचे भजन, रात्री 9.30 वा. ह. भ. प. शरद घाग यांचे कीर्तन होणार असून त्यांना प्रसाद शेवडे, अभिनव जोशी, विकास नर हे संगीतसाथ करणार आहेत. तरी कार्यक्रमांचा सर्वांनीलाभ घ्यावा, असे आवाहन जठार कुटुंबीय व गांगेश्वर प्रा. भजन व नाट्यमंडळाने केले आहे.