⚡कणकवली ता.०७-: कोळोशी बौद्ध उत्कर्ष मंडळ, मुंबई व गावा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध, छत्रपची शिवाजी महाराज आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव शनिवार 11 मे रोजी कोळोशी-बौद्धवाडी येथे होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9.30 वा. पंचशील, ध्वजारोहण, धम्मवंदना, 10 वा. बुद्ध पूजापाठ, सायंकाळी 3 वा. महिलांसाठी विविध स्पर्धा, सायंकाळी 5.30 वा. जयभीम रॅली, रात्री 7 वा. अभिवादन सभा, सत्कार सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभ होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क. ता. बौ. वि. संघाचे अध्यक्ष अंकुश कदम, उपाध्यक्ष सुनील तांबे, खजिनदार संजय कदम, नांदगाव विभागाचे अध्यक्ष राजेश तांबे, सचिव वसंत कदम, डॉ. चंद्रकांत पुरळकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, सामाजिक कार्यकर्ते चारुहास इंदप हे उपस्थितीत राहणार आहेत. रात्री 10 वा. महिलांचा कव्वाली सामना होईल. या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष पी. डी. कदम, सिद्धार्थ तांबे, सचिव श्रीकांत कदम, विश्वनाथ कदम व मुंबई आणि गाव शाखेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
