विश्रांतीधामच्या वर्धापनदिनानिमित्त 9 मे रोजीपासून विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०७-: शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. देवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमच्या 11 वा वर्धापनदिन व श्री गणेश मंदिर, फलाहारी बाबा गुरुकृपाधाम आश्रम, प. पू. देवी अनुसयामाता तपश्चर्यास्थानाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त 9 ते 13 मे या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत कुडाळ येथील शशिपाल डिचोलकर हे श्री राम रामेश्‍वरी या ग्रंथाचे पारायण करणार आहेत.
गुरुवार 9 रोजी सकाळी 9 वा. श्री रामप्रभू, श्री दत्तगुरुंच्या मूर्ती व प. पू. भालचंद्र महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, सायंकाळी 6 वा. प. पू. फलाहारी महाराज यांचे कणकवली आगमन, 6.15 वा. कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक ते विश्रांतीधाम आश्रमापर्यंत फलाहारी महाराज यांची भव्य मिरवणूक, रात्री 9 वा. आरती, महाप्रसाद होईल.
शुक्रवार 10 रोजी सकाळी 6 वा. श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ, लोणावळा यांची भूपाळीसंग्रह, काकड आरती, मंगलारती, 9 वा. श्री लक्ष्मीमातेच्या मूर्तीवर अभिषेक, फलाहारी महाराज यांची पाद्यपूजा, 10 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, 10.30 वा. संदेश सामंत यांचे भजन, दुपारी 12.30 वा. मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी 6.30 वा. ह. भ. प. प्रशांत धोंड यांचे कीर्तन, रात्री 9.30 वा. आरती, महाप्रसाद होईल.
शनिवार 11 मे रोजी सकाळी 6 वा. श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ, लोणावळा यांची भूपाळीसंग्रह, काकड आरती, मंगलारती, 8 वा. श्री मारुतीरायांच्या मूर्तीवर अभिषेक, फलाहारी महाराज यांची पाद्यपूजा, 11 वा. चिन्मय सावंत यांचे भजन, दुपारी 12.30 वा. मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी 6.30 वा. श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ, लोणावळा यांचे भजन, रात्री 8.30 वा. आरती, महाप्रसाद होईल.
रविवार 12 मे रोजी सकाळी 6 वा. श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ, लोणावळा यांची भूपाळीसंग्रह, काकड आरती, मंगलारती, 8 वा. सूर्यनारायणाच्या मूर्तीवर अभिषेक, फलाहारी महाराज यांची पाद्यपूजा, 10.30 वा. उदय राणे यांचे कीर्तन, दुपारी 12 वा. प. पू. देवी अनुसयामाता यांच्या पादुकांची फलाहारी महाराज यांच्या हस्ते स्थापना, दुपारी 1 वा. मध्यान्हारती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. मनोज मेस्त्री यांचे शास्त्रीय गायन, रात्री 10 वा. आरती व महाप्रसाद होईल.
सोमवार 13 रोजी सकाळी 6 वा. श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ, लोणावळा यांची भूपाळीसंग्रह, काकड आरती, 8 वा. श्री गणेशमूर्तीवर व श्री शंकराच्या पिंडीवर अभिषेक, 9 वा. फलाहारी महाराज यांची पाद्यपूजा, 10 वा. श्री गणेश मूर्तीची पालखी मिरवणूक, 11 वा. श्री भालचंद्र महाराज भजन मंडळ यांचे भजन, दुपारी 1.30 वा. आरती, महाप्रसाद, सायंकाळी 6.30 वा. स्नेहलदीप सामंत यांचे कीर्तन, रात्री 9.30 वा. वारकरी दिंडी, 10 वा. आरती व महाप्रसाद होईल. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. देवी अनुसया माता विश्रांतीधाम आश्रमाच्या संचालक मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page