विनायक राऊतांमुळे कोकणातील प्रकल्प रखडले…

नारायण राणें:उद्धव ठाकरेंचा उमेदवार इथे लढतोय, पण, दहा वर्षांत त्यांनी काय केल ? हे सांगू शकले नाही..

⚡सावंतवाडी ता.०५-: विनायक राऊत, उद्धव ठाकरेंमुळे कोकणातील प्रकल्प रखडले असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. राज्यात आणि देशात महायुतीचीच सत्ता येणार असा विश्वास राणेंनी व्यक्त केला. तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवताना चारशे पार करत असताना रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार त्यात असावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं आवाहन नारायण राणे यांनी केलं. सावंतवाडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षाचे बहुतेक नेतेमंडळी इथे येऊन गेले. पण, त्यांनी काय विकास केला ? हे सांगितल नाही. कोणते उद्योगधंदे, पायाभूत सुविधा, हाताला काम त्यांनी दिलं का ? उद्धव ठाकरेंचा उमेदवार इथे लढतोय. पण, दहा वर्षांत त्यांनी काय केल ? हे सांगू शकले नाही.अशी टीका देखील राणें यांनी यावेळी केली

You cannot copy content of this page