आम्ही काम करतो म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात…

दिपक केसरकर:नारायण राणेंना दिलेला बुके हा स्वागताचा नाही तर विजयाचा होता

⚡सावंतवाडी ता.०५-: विनायक राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासारखी माणसं काहीही करत नाहीत केवळ बोलत असतात. अडीच वर्षांत साधी पाणबुडी ते खरेदी करू शकले नाहीत.‌ पर्यटनासाठी एक रूपया त्यांनी पर्यटनमंत्री असताना दिला नाही. आम्ही काम करतो म्हणून लोक आमच्यावर प्रेम करतात. तर ज्यांची डिपॉझीट जप्त होतात त्यांच्यावर अधिक बोलणार नाही. मोदींच्या भाषेत सांगायचं तर असे अतृप्त आत्मे असतात असा जोरदार हल्लाबोल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. सावंतवाडीतील सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, नारायण राणेंना दिलेला बुके हा स्वागताचा नाही तर विजयाचा होता. काही लोक टीका करतात. मात्र, उत्तर ऐकायची तयारी त्यांची नसते. म्हणून, महिनाभर आधीपासून हा गांधी चौक बुक करून काहींनी ठेवला होता. पण, परवानगीचा अर्ज दिला नाही म्हणून गांधी चौक आम्हाला मिळाला. टीका करणाऱ्यांनी उत्तर ऐकायची पण तयारी ठेवावी असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उबाठा शिवसेनेला लगावला.

You cannot copy content of this page