विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करतायत…

चंद्रकांत जाधव:विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते असे बदल वक्तव्य करत आहेत..

⚡सावंतवाडी ता.३०-: बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न द्यायला 34 वर्ष लावणारे काँग्रेस आणि त्यांच्या सोबत असणारे मित्रपक्ष देशाचे पंतप्रधान संविधान बदलणार असे सांगत आहे. मात्र त्यांच्याकडे प्रचाराचे मुद्देच नसल्याने ते संविधानाच्या मुद्द्यावरून दलित बांधवांची डोकी भडकविण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप भाजपाचे अनुसूचित जाती जमाती जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांनी केला.

श्री जाधव यांनी आज येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयात पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर दिले.

यावेळी त्याच्यासोबत अनुसूचित जाती जमाती महिला जिल्हाध्यक्ष सोनिया मठकर, जिल्हा कोषाध्यक्ष अनंत आसोलकर, राजेश चव्हाण, प्रकाश कदम,वासुदेव जाधव, संजय डिंगणेकर, महेश चव्हाण, किशोर निगुडकर,उमेश मठकर आदी उपस्थित होते.

श्री जाधव म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवार विनायक राऊत आणि कार्यकर्त्यांकडे प्रचाराला मुद्दे राहीले नसल्याने ते पंतप्रधान मोदी देशाचे संविधान बदलणार असा प्रचार करत आहे. मुळात विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते असे बदल वक्तव्य करत आहेत मात्र काही झाले तरी दलित बांधव एक दिल्याने नारायण राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहेत. संविधान बदलणार असे काँग्रेस आणि मित्र पक्ष म्हणत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांना याच काँग्रेस कडून भारतरत्न द्यायला 34 का लागली. या लोकांनी दलिता बांधवांच्या वाढीवस्तीवर जाऊन कधी संविधानाचा गौरव केला आहे का उलट काँग्रेसकडून 106 वेळा घटना दुरुस्ती केली गेली आणि या दुरुस्त केलेल्या पुणे मध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत त्या त्रुटी सुधारण्यासाठी चारसोपाराचा नारा मोदींनी दिला आहे. त्यामुळे कोणी कितीही डोके भडकवण्याचा प्रयत्न केला तरी दलित बांधव कुठेही भरकटणार नाही मोदींना साथ देण्यासाठी नारायण राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन पुन्हा एकदा लोकसभेत पाठवणार आहोत.

You cannot copy content of this page