⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी साकेडी गावात बैठका घेतल्या. कोकणच्या विकासासाठी राणेंना निवडून देण्याचे अावाहन त्यांनी मतदारांना केले.
आ आयावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, केदार खोत, हुंरबटचे माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना, साकेडीचे माजी उपसरपंच जहुर शेख, अकबर शेख, अझहर शेख, दिलदार शेख अादी उपस्थित होते.
