⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा नागवे गावातील प्रचाराचा शुभारंभ भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्री देव नागेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून केला.
यावेळी सरपंच सिद्धीका जाधव, उपसरपंच महेंद्र कुडाळकर, ग्रा. पं. सदस्य संदेश सावंत-भोसले, बूथ अध्यक्ष सचिन खेडेकर, शशिकांत सातवसे, राजू पाटकर, मंगेश तेली, काका सातवसे, आबा कोरगावकर, बाबा मोरये, माजी सरपंच सत्यवान गावकर, श्री. आर्डेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
