परशुराम जयंतीनिमित्त 10 मे रोजी आर्यादुर्गा मंदिरात कार्यक्रम…

⚡कणकवली ता.३०-: महाराष्ट्र ब्राह्ममंडळच्या कणकवली शाखेतर्फे शुक्रवार 10 मे रोजी वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात परशुराम जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी केली जाणार आहे.


सायंकाळी 4.30 वा. प्रभू परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन, मंत्र पुष्पांजली, 5 वा. महिलासाठी हळदीकुंकू समारंभ, 5.30 वा. हर्ष नकाशे यांची स्वरहर्ष संगीत मैफिल होईल. त्यांना संगीतसाथ पकंज सावंत, सुबोध मालंडकर, चिन्मय सावंत, सचिन खोचरे करणार असून सूत्रसंचालन संजय कात्रे करणार आहेत. 7 वा. आरती व तीर्थप्रसाद होईल. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page