⚡कणकवली ता.३०-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा कुरंगवणे-गोठणकरवाडी येथे महायुतीचे कार्यकर्ते प्रचार करीत आहेत.
माजी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, रवींद्र लाड, सरपंच पप्पू ब्रह्मदांडे, उपसरपंच बबलू पवार, बूथअध्यक्ष संजय लाड, नारायण कदम, पांडुरंग गोठणकर, दिनकर गोठणकर, गणेश गोठणकर हे सहभागी झाले. कुरंगवणे गावातून राणेंना मोठे मताधिक्य देणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
कुरंगवणे येथे राणेंचा प्रचार…
