दारिस्ते- बौद्धवाडीत संदेश सावंत यांच्याकडून पाण्याची व्यवस्था…

⚡कणकवली ता.३०-: दारिस्ते – बौद्धवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना अन्य ठिकाणांहून पाणी आणावे लागत होते. साहजिकच ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती. याबाबत माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वखर्चाने 300 मिटर लांबीची पाईपलाईन देऊन दारिस्ते – बौद्धवाडीपर्यंत पाणी नेण्याची व्यवस्था केली. या समस्येबाबत दारिस्ते सरपंच सानिका गांवकर, उपसरपंच संजय सावंत, माजी उपसरपंच संजय गांवकर यांनी गोट्या सावंत यांचे लक्ष वेधले होते. पाण्याची सोय केल्याबाबत दारिस्ते – बौद्धवाडीमधील ग्रामस्थांनीही सावंत यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page