जसं मला या प्रभागातून लोकांनी भरगोस मत दिली त्याहून अधिक मत मी राणेंना देणार…

संजू परब: सावंतवाडीकर यावेळी नक्कीच परिवर्तन करतील..

⚡सावंतवाडी ता.२९-: जसं मला या प्रभागातून लोकांनी भरगोस मत दिली त्याहून अधिक मत मी नारायण राणेंना माझ्या प्रभागातून देणार असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज इथं व्यक्त केले.

दरम्यान नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावंतवाडीतील नागरिकांमध्ये एक आनंदाच वातावरण निर्माण झालय. त्यामुळे नक्कीच या यावेळी परिवर्तन होऊन सावंतवाडीकर राणेंच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास देखील श्री. परब यांनी यावेळ व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page