⚡सावंतवाडी ता.२९-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शहरातील माठेवाडा झिरंगवाडी वॉर्ड क्रमांक चारमध्ये शुभारंभ करण्यात आला. नारायण राणेंना शहरातून सर्वाधिक लीड देणार असल्याचा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, बबलू मिशाळ, देव्या सुर्याजी, भाजपचे पदाधिकारी कुणाल सावंत, संदेश टेमकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
माठेवाडा येथे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…
