अशोक राणे:भाजप प्रणीत संघटनेत एसटी कर्मचाऱ्यांचा संजू परब यांच्या उपस्थितीत प्रवेश..
⚡सावंतवाडी ता.२९-: सेवा शक्ती संघर्ष जनसंघ संघटना भाजप प्रणीत असून कामगारांच्या हितासाठी काम करते. एसटी कर्मचारी यांच्या संपावेळी मागील सरकारकडून अन्याय झाला, मागण्या पूर्ण केल्या नाहीत. संप संपल्यावर भाजप प्रणीत ही संघटना अस्तित्वात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विश्वास ठेवून काम करणारी ही संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असा विश्वास याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप प्रणीत सेवा शक्ती संघर्ष जनसंघ या संघटनेत सावंतवाडी एसटी डेपोतील ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. महायुतीच्या प्रचार कार्यालयात भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
दरम्यान भाजप प्रणीत सेवा शक्ती संघर्ष जनसंघ या संघटनेत सावंतवाडी एसटी डेपोतील भगवान वरक, संदीप गवस, धोंडीबा दळवी, आनंद लांबर, कृष्णा सावंत, गुंडू सावंत, जयवंत सासोलकर, सचिन साळगावकर, आबा माणगावर, अमोल धाऊसकर, विशाल मेस्त्री, संजय भगत आदींसह ३० हून अधिक कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप प्रणीत सेवा शक्ती संघर्ष जनसंघ, कामगारसेना जिल्हाध्यक्ष अशोक राणे,तालुकाध्यक्ष अजय गोंदावळे, कामगार मोर्चा शहराध्यक्ष विनोद सावंत, दोडामार्गचे नगरसेवक राजेश प्रसादी, राम वाडकर, केतन आजगावकर, सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.
