⚡कणकवली ता.२९-: सावडावचे माजी सरपंच व शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. सावडावात ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत, उत्तम वारंग, सिद्धेश लोके अशोक वारंग यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यंकटेश वारंंग यांचा भाजपमध्ये प्रवेश…
