कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या वागदे येथील प्रचारसभेला निवडणूक विभागाने 2 तासांची परवानगी दिली. त्यामुळे वेळेअभावी ही प्रचारसभा आटोपती घ्यावी लागली. याबाबत विनायक राऊत यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली. सभेच्या वेळेसंदर्भात झालेली चूक निवडणूक विभागाने मान्य करीत, पुढील सभांना आयोगाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे परवानगी दिली जाईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. प्रचारसभेसाठी दिलेली 2 तासांची परवानगी हा सत्ताधार्यांचे षड़्यंत्र असल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी केला. दरम्यान, कणकवलीचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांची विनायक राऊत यांनी भेट घेत सभेसाठी दिलेल्या कमी वेळेच्या परवानगीसंदर्भात चर्चा केली.
कमी वेळेची परवानगी; मविआची सभा आटोपती..
