कलमठ-गावडेवाडीतील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 1 मे राेजी वर्धापन दिन..

कणकवली ः कलमठ-गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिराचा सातवा वर्धापन दिनानिमित्त बुधवार 1 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


सकाळी 6 वा. काकड आरती, 9.30 श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, 7 वा. काेटेश्वर प्रासादिक भजन मंडळ हरकुळ बुद्रुक बुवा सुजित परब यांचे भजन हाेणार आहे. रात्री 9 वा. ओम साईलिला प्रा भजन मंडळ भांडुप (मुंबई) चे बुवा चंद्रकांत जाधव व विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आजीवली-सोनारवाडी (राजापूर)चे
बुवा प्रवीण सुतार यांच्यात 20×20 डबलबारीचा सामना होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, आवाहन श्री देव लिंगेश्वर मित्रमंडळ केले आहे.

You cannot copy content of this page