दाभोळेचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२४-: देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी आपल्या समर्थकांसह अाेेम गणेश निवासस्थानी येथे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणे यांनी स्वागत केले. प्रदीप कुळकर, विनायक तेली, नरेश कुळकर, संदीप कुळकर, विवेक कुळकर, वसंत मालपेकर, पंकज कुळकर, किशोर चव्हाण, राजेश राऊळ, सुरज धुरी, गोपाळ मुळेये, विनायक राऊत,मनोहर राऊत, रवींद्र राऊत,ज्ञानेश्वर राऊत,संदीप राऊत, संतोष राऊत, राजेंद्र राऊत,जयेश थोटम, पप्या घाडी आदींनी प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, नंदू देसाई,प्रदीप देसाई, शशिकांत गोठणकर, पिंटू लाड गावकर,उमेश गोठणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कणकवली मतदारसंघाचा विकास आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे .या विकास प्रक्रियेत दाभोळे गावाचा ही सहभाग असावा यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व कोकणाचा विकास होत आहे. त्यामुळेच केंद्रीयमंत्री नारायण राणे व नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पक्षप्रवेश करत असल्याचे सरपंच अनभवाने यांनी सांगितले.

You cannot copy content of this page