चिंचवलीचे सरपंच अशोक पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२४-: चिंचवली ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पाटील व ग्रा. पं. सदस्यांनी आपल्या समर्थकांसह आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थित अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणे यांनी स्वागत केले.

सुनील भालेकर, अनंत भालेकर, संजय भालेकर, राजेंद्र पेडणेकर, चंदू पेडणेकर,संतोष भालेकर , पांडुरंग पेडणेकर,रश्मी पेडणेकर, प्रमिला पाटील, महेश बांदिवडेकर, दीपक बांदिवडेकर, गुरुनाथ आंब्रे,अक्षता आंब्रे, चंद्रकांत पेडणेकर, मधुकर बांदिवडेकर, यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या वेळी जि. प. चे माजी सभापती बाळ जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, हरकुळ खुर्दचे बाबू रासम, माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर , रवी शेटये, राजू जठार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय उद्योगमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन चिंचवली गावच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सरपंच अशोक पाटील यांनी सांगितले.

You cannot copy content of this page