देवगड / प्रतिनिधी
शिरगाव बौद्धवाडी येथील जयचंद तुळाजी शिरगावकर (६५) यांचे मंगळवारी दुपारी २.१५ वा. च्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
दिलेल्या माहितीनुसार, जयचंद शिरगावकर हे मंगळवारी दुपारी देवगड ग्रामीण रुग्णालयात आले होते. यावेळी तेथे त्यांना चक्कर ते जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. घटनेची फिर्याद समीर भगवान शिरगावकर (३४, शिरगाव बौद्धवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस हवालदार एस. एस. सावंत करीत आहेत.
