शेर्पे घरफोडीतील आरोपींना अटक…

⚡कणकवली ता.२३-: शेर्पे – मुस्लिमवाडी येथील शैरफुद्दीन अब्दुल लतिफ जैतापकर (60) यांच्या बंद घर फोंडून कपाटातील 8 हजार 500 रुपये लंपास करणारे चोरटे धीरज यशवंत जाधव (29) व राकेश यशवंत जाधव (26, दोन्ही रा. कुरंगवणे – बौद्धवाडी) या सख्ख्या भावांना कणकवली पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये जेरबंद केले. याकामी पोलिसांना श्‍वानपथकाचेही विशेष सहकार्य लाभले. वरील संशयितांनी चोरी केल्याचे सोमवारी सायंकाळी 6.30 वा. सुमारास उघड झाल्यानंतर रात्री 11 वा. सुमारास त्यांना अटक करण्यात आली.


चोरट्यांना अटक करण्यामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्यासह खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे तसेच श्‍वानपथकाचे अमित वेंगुर्लेकर व अन्य कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी केली. विशेषत: ‘रॅम्बो’ या श्‍वानमुळे चोरटे सापडू शकले. चोरटे तळेरे बसस्थानकातून एसटीतून मुंबईकडे जात असतान पोलिसांनी त्यांना एसटीतून अटक केली. धीरज जाधव याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. धीरज व राकेश हे मुंबईत कामाला असून ते दोघे गावी येऊन चोरी करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांनी दिली.

You cannot copy content of this page