पाडलोसमध्ये 25 व 26 रोजी विविध कार्यक्रम…

⚡बांदा ता.२३-: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त दि. 25 व 26 एप्रिल रोजी पाडलोस सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ शितलवाडी व पाडलोस ग्रामस्थ यांच्या सहकार्याने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


सकाळी 10 वा. प्रतिमेचे पूजन व वंदना होणार. समारंभाचे अध्यक्षपदी पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, प्रमुख पाहुणे हरिश्चंद्र मणेरकर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत, महारॅली, विविध स्पर्धा, मुलांचे व महिलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. दि. 26 एप्रिल रोजी रात्री 8.30 वा. वावळेश्वर दशावतार यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन, सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ शितलवाडी पाडलोसचे अध्यक्ष वासुदेव पाडलोसकर, सचिव सुनील पाडलोसकर, खजिनदार उमेश पाडलोसकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page