Headlines

आनंदव्हाळ येथील गोपाळकृष्ण मंदिराचा १ रोजी कलशारोहण सोहळा…

⚡मालवण ता.२२-: मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराचा कलशारोहण समारंभ दि. १ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी सायं. ३.३० वा. श्री गिरोबा मंदिर, नांदरुख (चौकेमार्गे) ते श्री गोपाळकृष्ण मंदिर, आनंदव्हाळ अशी कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. बुधवार दि. १ मे रोजी सकाळी ८.०० वा. देवदेवतांना नारळ व विडे अर्पण, सकाळी ८.३० वा. श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आचार्य वरण, सकाळी ९.३० वा. स्थळ शुद्धी, आचार्य कर्म, सकाळी १०.०० वा. कलश पूजन, शुद्धीकर्म, सकाळी ११ ते १२ वा. कलशारोहण विधी श्री श्री १०८ महंत मठाधीश, गावडे काका महाराज माड्याचीवाडी कुडाळ यांच्या हस्ते होणार आहे. दु. १२ ते १ वा. देवतास्थापन – वास्तूश्रयण- हवन- ग्रहशांती हवन, मुख्य हवन, दु. १ वा. बलिदान, पूर्णाहुती, कर्मसमाप्ती, महाआरती, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. किर्तनकार श्री. विवेक वायंगणकर, मालवण यांचे कीर्तन, सायंकाळी ७ वा. गोफनृत्य (वारकरी भजन) – बुवाः श्री. विश्राम घाडी, श्रावण, पखवाजः विपुल सावंत, वीर महापुरुष प्रासादिक दिंडी भजन मंडळ, रात्री ९ वा. बुवा अरुण घाडी (कुडाळ ) विरुद्ध बुवा अभिषेक शिरसाट (कणकवली) यांच्यात डबलबारी जंगी सामना होणार आहे.

दि. २ मे रोजी दुपारी १ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी ३ वा. महाआरती, दु. ३. ३० वा. तीर्थप्रसाद व हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ ते ७वा. सुस्वर भजने व सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, माड्याची वाडी, कुडाळ यांचे सुस्वर भजन – बुवा : श्री. ऋषिकेश गावडे, पखवाज : श्री. लक्ष्मण गावडे (आप्पा), रात्री ८ वा. मान्यवरांचा सत्कार व विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ, रात्री ९.३० वा. श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचे दशावतारी (दहिकाला) नाटक- श्री. भाई कलिंगण यांचे जिल्ह्यातील सुप्रध्दित कलाकारांसहित संयुक्त नाटक सादर होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदव्हाळ तरुण सुधारक मंडळ मुंबई / ग्रामस्थ यांनी केले आहे.

You cannot copy content of this page