राणेंना शहरातून मताधिक्य द्यावे…

आमदार नीतेश राणे यांचे आवाहन ः कणकवली शहरात प्रभागनिहाय बैठका..

⚡कणकवली ता.२२-: कोकणासह कणकवली शहराचा विकास करण्याची क्षमता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यात आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना शहरातून मताधिक्य देण्याचे कामगिरी शहरवासीय निश्चितपणे करतील, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
नीतेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी कणकवली शहरात प्रभागनिहाय बैठका पार झाल्या. या बैठकांना कणकवलीकरांची लक्षणीय उपस्थिती होती. येथील लक्ष्मीविष्णू हॉल येथे झालेल्या बैठकीला माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, माजी पं. स. सभापती सुरेश सावंत, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, बुथ अध्यक्ष गंगाधर सावंत, महिला बुथ अध्यक्ष आसमा बागवान, प्रभाग अध्यक्षा उज्ज्वला ताम्हाणेकर, किरण म्हाडगुत आदी उपस्थित होते.
नीतेश राणे म्हणाले, कणकवली नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासासाठी नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आदींच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी मिळाला. तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे, तत्कालीन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह सर्व तत्कालीन सत्ताधारी नगरसेवक शहराच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहीले. नलावडे व त्यांच्या सहकार्‍यांनी राबविलेले अनेक उपक्रम हे कौतुकास्पद होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शहरतील क्रीडा संकुल, बारमाही धबधबा, जानवली नदीवरील पूल अशी अनेक कामे साकारू लागली.
मेघा गांगण म्हणाल्या, कणकवली शहरासह जिल्ह्याच्या, कोकणााच्या विकासासाठी नारायण राणेंची आवश्यकता आहे. याबाबत सर्व कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन नारायण राणेंचे महत्व सांगावे. विद्यमान खासदार विनायक राऊत गेल्या दहा वर्षांमध्ये कोणताही ठोस विकास करू शकलेले नाही, अशी टीका त्यांनी केली.

You cannot copy content of this page