Headlines

हनुमान जयंतीनिमित्त तोंडवलीत उद्या कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२२-: तोंडवली-बोभाटेवाडी येथील हनुमान मित्रमंडळातर्फे बोभाटेवाडी येथील हनुमान मंदिरात मंगळवार २३ एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.
पहाटे ५.३० वा. श्री हनुमान जन्मोत्सव, ७ वा. श्री हनुमान पूजन व आरती, ८ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. भजने, ८ वा. बक्षीस वितरण समारंभ, रात्री १० वा. दत्तामाऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘सहस्त्रनागबळी’ हा प्रयोग सादर होईल. तरी जयंती उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, सचिव महेश बोभाटे, खजिनदार मंगेश बोभाटे व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page