बबन साळगावकर: उमेदवार म्हणून सुरवातीला फिरवल आणि राणेंना जवळ करुन किरण सामंतांचा अपमान केला..
⚡सावंतवाडी ता.२२-: राणेंचा एवढा दरारा असताना आज त्यांना केसरकर यांच्या घरी जाण्याची कमजोरी का आली असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला. दरम्यान केसरकर हे राणेंसोबत आले म्हणजे त्यांचा पराभव अटळ आहे असेही ते म्हणाले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी साळगावकर पुढे बोलताना म्हणाले शिवसेना नेते किरण सामंत किरण सामान हे लोकसभेचे उमेदवार आहेत ते सांगून त्यांनी जिल्ह्यात सर्व तालुक्यात फिरवले परंतु ऐनवेळी किरण सावंत यांचा घात करून ते काय मंत्री होऊ शकतात का..? असं वक्तव्य केसरकर करून एक प्रकारे सामंत यांचा अपमान केलाय त्यामुळे सामंत यांनी त्यांची योग्य जागा दाखवावी व योग्य निर्णय घ्यावा असे श्री साळगावक, बोलताना म्हणाले.
