⚡कणकवली ता.१७-: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राज्यभर राबविले जात आहे. या अभियांतर्गत स्वच्छता समितीने खारेपाटण बसस्थानक परिसरातील पाहणी केली.
रत्नागिरी विभागाचे नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, उपयंत्र अभियंता मृदुला जाधव, कामगार अधिकारी विलास चौगुले यांचा समावेश असलेली ही समिती होती. पाहणी दरम्यान पत्रकार संतोष पाटणकर, प्रवासी मित्र शिवाजी पाटील हे उपस्थित होते. वाहतूक नियंत्रक मनोहर चव्हाण यांनी समितीचे स्वागत करत स्थानक परिसरात असलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली. प्रज्ञेश बोरसे यांनी स्थानक परिसरात असलेल्या स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करताना काही त्रुटी त्यांना दिसून आल्या. त्या दूर करण्याची सूचना त्यांनी संबधितांना केली.
