विनायक राऊत यांचे प्रतिपादन: शिरवल येथे खळा बैठक..
⚡कणकाली ता.१६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा मी गेली १० वर्ष खासदार आहे. कोकणातील विविध प्रश्न व समस्यांबाबत संसदेत आवाज उठवला आहे. त्यापैकी काही प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत. खासदारकीच्या माध्यमातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. कोकणाचा विकास हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.
शिरवल येथे रविवारी आयोजित केलेल्या खळा बैठकीत श्री. राऊत बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेशपारकर, कणकवली विधानसंपर्कप्रमुख सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे,युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी जि. प. सदस्य बाळा भिसे, उपजिल्हाप्रमुख राजू राणे, बंडू ठाकूर, संदीप कदम, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंतयुवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके, कळसुली विभागसभाप्रमुख चंदू परब, माजी तालुकाप्रमुख सचिन सावंत, शाखाप्रमुख प्रमोद सावंत, शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, रविकांत सावंत, भाई कोदे आदी उपस्थित होते.
लघू, सुक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले लाभार्थी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आहेत, अशी टीका राऊतांनी केली. मोदी सरकारच्या १० वर्षांतील कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीत परिवर्तन केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा दावा त्यांनी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी टीकास्त्र सोडले केली. यावेळी मविआचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
