मालवण नगरपालिकेने स्ट्रीट लाईटचे योग्य नियोजन करावे…

नगरसेवक आपा लुडबे_

*💫मालवण दि.२४-:* मालवण नगरपालिकेने शहरात स्ट्रीट लाईट लावण्यासाठी मागविलेल्या २४०० स्ट्रीट लाईट पैकी दुसऱ्या टप्प्यातील ४०० स्ट्रीट लाईट आलेल्या आहेत. या स्ट्रीट लाईटचे योग्य नियोजन करून ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात याव्यात. तसेच स्ट्रीट लाईटचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीकडून योग्य प्रकारे काम करून घ्यावे अशी मागणी मालवणचे नगरसेवक परशुराम उर्फ आपा लुडबे यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात स्ट्रीट लाईटचे व्यवस्थापन हे मालवण नगरपरिषद व इइएसइल कंपनी या दोघांच्या माध्यमातून पाहिले जाते. परंतु मालवण नगरपरिषदेचा मागील दहा ते पंधरा वर्षाचा इतिहास पाहता बहुतांश स्ट्रीट लाईट ह्या नगरसेवकच स्व:खर्चातुन लावतात. मागील मुख्याधिकाऱ्यांना या विषयाला दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मालवण मधील २४०० स्ट्रीट लाईट पैकी यापुर्वी ८७० स्ट्रीट लाईट कंपनीने लावलेल्या आहेत. पुन्हा काही महिन्यानंतर पुन्हा ८०० स्ट्रीट लाईटची ऑर्डर दिली होती. यापैकी ४०० स्ट्रीट लाईट आलेल्या आहेत. त्याचे योग्य नियोजन आपल्याकडून व्हावे व ज्या ठिकाणीच्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्या सर्व ठिकाणी लावण्यात याव्यात. त्यासाठी तक्रार रजिस्टरचा वापर व्हावा. अजुन ८०० स्ट्रीट लाईटची ऑर्डर देणे आवश्यक आहे, ती लवकरात लवकर द्यावी, असे आपा लुडबे यांनी निवेदनात म्हटले आहे. स्ट्रीट लाईटचे पूर्ण नियोजन हे नगरपरिषदेने सर्व लोकप्रतिनिधीच्या सहकार्यातून करावे व बंद लाईट हे कंपनीकडून लावून द्यावेत. कारण या लाईटना सात वर्षाची वॉरंटी असून ते बंद पडल्यास दुरुस्त करण्याची जबाबदारी कंपनीचीच आहे. जर हे नियोजन झाले नाही व कंपनीकडून काम करुन घेतले नाही व रिपोर्टप्रमाणे लाईट त्या पोलवर दिसले नाही तर कंपनी मेंटनन्ससाठी हातवर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. व यात मालवण जनतेलाच आपण अंधारात चालायला लावणार आहात. तरी योग्य नियोजन करुन कंपनीकडून योग्य प्रकारे काम करुन घ्यावे व उर्वरीत स्ट्रीट लाईटचीही ऑर्डर देऊन स्ट्रीट लाईटचे पूर्ण व्यवस्थापन संबंधित कंपनीकडे द्यावे, अशी मागणी आपा लुडबे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

You cannot copy content of this page