शेर्ले माळरानावर भीषण आग.

४० ते ५० एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी : काजू कलमे जळल्याने अंदाजे दोन लाखांची नूकसानी

*💫बांदा दि.२४-:* शेर्ले येथे माळरानावर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ४० ते ५० एकरावर भिषण आग लागली. सुदैवाने या भागामध्ये चिरेखाणि असल्यामुळे मोठी नुकसानी झाली नाही. सुके गवत आणि कडक उन्हामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. जवळपास ४० ते ५० एकर क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. आग लागल्याचे वृत्त कळताच देविदास सातार्डेकर, सुभाष भाईप, पुंडलीक भाईप, सागर भाईप, अनिल भाईप, प्रविण भाईप, विश्वास गावडे यांच्यासह तिलारी उप कालव्याच्या कामाचे १५ कामगारांनी धाव घेऊन आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र चिरेखणी आणि सुकेगवत,मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे आग विझवायला अनेक अडचणिचा सामना करावा लागत होता. सावंतवाडी नगरपालीकेला कळवताच बंब दाखल झाला परंतू आगीने जवळपास ४० ते ५० एकर क्षेत्र आगीच्या विळख्यात सापडल्याने आग आटोक्यात येत नव्हती. रात्री उशीरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. आगीमध्ये अरुण धुरी यांची काजू कलमे जळल्याने जवळपास दोन लाखांची नूकसानी झाली. सुदैवाने या आगीत तिलारी उप कालव्याचे पाईप वाचल्याने मोठी नूकसानी टळली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

You cannot copy content of this page