सावंतवाडी तालुक्यात जीर्ण विद्युत खांब तात्काळ बदला…

अर्चना घारे ; पावसाळ्यापूर्वी झाडाच्या फांद्या तोडा.

सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील जीर्ण झालेले विद्युत लोखंडी खांब्यांची तात्काळ सर्वेक्षण करून त्वरित बदलण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सौ अर्चना घारे परब यांनी आज येथे निवेदनद्वारे केली.

दरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने शहरात अनेक ठिकाणी पोल हे जीर्ण झाले आहे.तसेच विजेचा खांबावर झाडाच्या फांदी देखील आल्या आहेत त्यामुळे ते देखील तात्काळ तोडून पावसाच्या पूर्वी हे सर्व कामे मार्गी लावावी अशी मागणी देखील
सौ. घारे यांनी यावेळी केली आहे.

यावेळी अर्चना घारे परब पुढे बोलताना म्हणाले की आज माझगाव येथे घडलेली ही घटना ही दुर्देवी असून सुदैवाने त्या युवकाला कोणती दुखापत झाली नाही त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी आपण त्वरित याची दखल घेऊन तालुक्यातील जीर्ण झालेल्या लोखंडी खांब पावसाळ्यापूर्वी बदलण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनद्वारे केली आहे

You cannot copy content of this page